घरठाणेठाण्यात तीन ठिकाणी सुरू होणार मॉर्निंग वॉक प्लाझा

ठाण्यात तीन ठिकाणी सुरू होणार मॉर्निंग वॉक प्लाझा

Subscribe

महापालिका आयुक्तांची नवीन संकल्पना येत्या १ एप्रिल प्रत्यक्षात

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिडनंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम व मॉर्निंग वॉक प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना सुरक्षितपणे व्यायाम व चालता यावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात ३ ठिकाणी येत्या १ एप्रिल, २०२२ पासून ”मॉर्निंग वॉक प्लाझा” सुरू करण्यात येणार आहे.

गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपवन परिसरात ‘’मॉर्निंग वॉक ट्रॅक’’ संदर्भात पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपायुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, सर्व कार्यकारी अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
सध्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक महत्वाचा विषय आहे. यासाठी शहरातील उपवन परिसरात वाहतूक विभागाशी समन्वय साधून “मॉर्निंग वॉक प्लाझा” ही नवीन राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला असून या संदर्भातील ट्रॅकचा पाहणी दौरा आज करण्यात आला.

- Advertisement -

याचदरम्यान उपवन परिसरात तातडीने मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे काम हाती घेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच दोन्ही बाजूला पदपथ बांधणे, स्वच्छता, साफसफाई, भिंतीची रंगरंगोटी व वृक्ष लागवडही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. महापौर निवासस्थान ते पायलादेवी मंदिर चौक, वीर बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ नाट्यगृह आणि धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ते वाहतूक पोलीस ऑफिस या ठिकाणी “मॉर्निंग वॉक प्लाझा” तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ५.३० ते ८.०० या कालावधीत हा मॉर्निंग वॉक प्लाझा सुरु राहणार आहे. या वेळात वाहतूक विभागाशी समन्वय साधून या ठिकाणाची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -