घरठाणेकोल्डकॉफी देणारे खासदार निवडणूक लढणार नाहीत-आदित्य ठाकरे

कोल्डकॉफी देणारे खासदार निवडणूक लढणार नाहीत-आदित्य ठाकरे

Subscribe

कल्याणमध्ये आदित्य ठाकरे यांचे सरकारवर टिकास्त्र

कल्याण । कोल्डकॉफी देणारे खासदार इथून निवडणूक लढाणार नाहीत असे ऐकले असून त्यांच्यात हिंमत असेल तर कल्याणमधून लढून दाखवा, जिंकून दाखवा, असे आव्हान माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिले, तसेच विद्यमान सरकारवर खरमरीत टिका केली. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी कल्याण लोकसभा क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखेला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेना कोळसेवाडी मध्यवर्ती शाखेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, वरुण सरदेसाई, अल्ताफ शेख, माजी महापौर रमेश जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, विजया पोटे आदी पदाधिकार्‍यांसाह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी येथे लढायला तयार आहात की नाही, हे विचारायला आलो असून भाजपाने चिंधीचोरांचे सरकार बसवले आहे. गुन्हेगारांमध्ये सरकारची भीती असायला हवी. पण गद्दारांचे सरकार असल्याने गुंडाराज पसरले आहे. भाजपा आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळी घातली. दोन्ही बाजुंनी चाललेली गुंडागर्दी सुरू असून ते सरकार उलथवणार की नाही, असा सवाल उपस्थितांना विचारला. मिंधे सरकार बदनाम झाले आहेच पण यामुळे आपला महाराष्ट्र बदनाम होत आहे. गुंड लोकं भेट घेत आहेत, रिल्स बनवत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका बघत नाही, त्यांच्या बॅनरवर कारवाई करत नाही. ठाण्यापासून येताना प्रत्येक बॅनर वर त्यांच्या पोज बघायला मिळत आहेत यामध्ये भीती बघायला मिळत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. आम्हाला कायद्याचा धाक धकवतात. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील उद्योजकांना घाबरवल जातं त्यांना गुजरातला पळवले जात आहे. छोटे उद्योजकांकडे खंडणी मागितली जात आहे. ठाण्यात महिलेला लाथा मारल्या त्यावर कारवाई झाली नाही.
माहीमला गणपती मिरवणुकीत त्यांच्या आमदाराने बंदूक रोखली त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना सिद्धिविनायक मंदिर न्यासाच अध्यक्ष बनवले आहे. पुण्यात गुंडाची परेड काढली हे गुंड जेलमध्ये पाहिजेत, पण हे गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स बनवतात. या गुंडांची धिंड काढायची झाली तर पहिले कोण उभं असेल असा सवाल आदित्य यांनी केला.

- Advertisement -

दोन वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरळीत सुरू होते. मात्र यांनी सर्व उद्योग गुजरातला पळवले. उल्हासनगर मधील पोलीस स्टेशन मधले सिसिटीव्ही फुटेज बाहेर आले. मात्र माहीम मधले फुटेज बाहेर आले नाही. कल्याण लोकसभेत भाजपाची गळचेपी होतेय की नाही, हा सवाल भाजपाच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल तर गुंडांना शूट अ‍ॅट साईटच्या ऑर्डर द्या, बाळासाहेबांनी गुंडगिरी साफ केली होती. जे पक्ष महिलेवर अत्याचार करतात अशांना फासावर द्यायचे सोडून त्यांना हार घालता, अशी टीका करत महाराष्ट्र हिताचे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा चिन्ह मशाल आणि विजय विशाल असेल. 2024 ची निवडणूक करा किंवा मरा अशी झाली आहे. लोकशाही टिकेल की नाही ते सांगता येत नाही अशी चिंता देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -