घरठाणेअवकाळी पावसाने भिवंडी बाजारपेठेत चिखल

अवकाळी पावसाने भिवंडी बाजारपेठेत चिखल

Subscribe

ग्रामीण भागात शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल

सोमवारी रात्री होळी लागल्यानंतर मध्यरात्रीपासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे होळीची रात्र जागविणार्‍या तरूणांना घराचा रस्ता धरावा लागला. रात्रभर सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचले होते, तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते . या चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना मंगळवारी दिवसभर नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती.

शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने ग्रामीण भागात शेतकर्‍यांसह वीट उत्पादक देखील हवालदिल झाले असून अनेक वीटभट्टी मालकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.तर कच्च्या आणि भाजलेल्या पक्क्या तयार विटांवर प्लास्टिक टाकण्यात वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली होती. विटांसाठी तयार केलेल्या मालाचा पावसामुळे गाळ झाल्याने तसेच कच्च्या विटा भिजल्याने पुन्हा विटा बनविण्याचा भुर्दंड अनेक वीटभट्टी मालकांना बसणार आहे. तसेच पावसामुळे शेतकर्‍यांची शेती देखील खराब झाली असून त्यांचे देखील या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने शासनाने शेतकर्‍यांना आणि वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून आणि वीट उत्पादकांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -