घरठाणेविरोधी पक्षनेतेपदाचा अगला स्टेशन मुंब्रा...!

विरोधी पक्षनेतेपदाचा अगला स्टेशन मुंब्रा…!

Subscribe

वेध परिसराचा / ठाणे

महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्षनेते या पदांना स्थानिक राजकारणात एक महत्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी जणू एक प्रकारे वेळोवेळी स्पर्धा होताना दिसते. त्यातच, स्थानिक पक्षश्रेष्ठी जवळपास हे पदे आपल्या सहकाऱ्यांना देताना प्रामुख्याने दिसतात. तसा तो त्या-त्या पक्षांचा खाजगी विषय आहे. मात्र, ठाणे महानगर पालिकेत सध्या राज्यात नावाजलेल्या काही नेतेमंडळींनी आपले विधानसभा मतदार संघ भक्कम ठेवण्यासाठी ही असामान्य स्थान असलेली पदे त्या- त्या मतदारसंघातील आपल्या लाडक्या चेले कंपनींना आंदण केल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यातच ठामपात विरोधी पक्षनेते पद मागील पाच वर्षात कळवा आणि मुंब्रा या शहरात एकापाठोपाठ हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे, मध्य रेल्वेतून ठाण्याकडून कल्याणकडे प्रवास करताना कळव्यानंतर सर्वांचा कानावर येणारा शब्द अगला स्टेशन मुंब्रा पडतो. तशीच काहीशी अवस्था ठामपा विरोधीपक्ष नेतेपद कळव्यानंतर मुंब्राकडे गेल्याने राष्ट्रवादीत ऐकण्याबरोबर पाहण्यास ही मिळत आहे.

ठाणे महापालिकेच्या २०१७ साली सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची आघाडी झाली होती. त्या पक्षांच्या वाटाघाटीत जागा वाटपही झाल्या. तर या निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरला आणि संख्याबळानुसार राष्ट्रवादी पक्ष दोन नंबरवर राहिला. त्यांच्या संख्याबळानुसार शिवसेनेकडे महापौर तर राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद गेले. महापौरपदासाठी महिला आरक्षण असलेल्या त्यावेळी मीनाक्षी शिंदे या विराजमान झाल्या तर विरोधी पक्षनेते पदाची धुरा राष्ट्रवादीचे मिलिंद पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली. अडीच वर्षांनी महापौर आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दुसऱ्यांकडे वर्ग करण्यात आली. महापौरपदी नरेश म्हस्के यांची निवड झाली. पण, विरोधीपक्ष नेते पद मिळविण्यासाठी चुरस पाहण्यास मिळाली. यावेळी एक – एक वर्षाच्या बोलाचालीवर हे पद कळव्यातील ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी यांच्याकडे सोपण्यात आले.

- Advertisement -

याचदरम्यान राज्यात राजकारणात मी पुन्हा येईल… या वक्तव्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. आणि मुख्यमंत्री पदावरूनच युतीत बिघाडा झाला आणि नव्या महाविकास आघाडीचा जन्म ही आली. विभिन्न विचाराचे पक्ष एकत्र आल्यावर त्यांच्या कुरघोडी सुरू झाला असून त्या- त्या पक्षांनी आगामी स्थानिक पातळीवरील निवडणूका स्वबळावर लढवण्याचे वक्तव्य करणे सुरू केले आहे. तर ठाणे महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्षनेते हे महाविकास आघाडीतील पक्षांकडे असल्याने मध्यंतरी पालिका अंर्तगत आलेल्या प्रभाग समित्या असो या विशेष समित्यामध्ये महाविकास आघाडीने जुळवून घेत महाविकास आघाडीचे चित्र तयार केले. ठाण्यातील दोन आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. तसेच त्यांचे जिल्ह्यात तसे पाहिले तर चांगलेच वर्चस्व आहे. याच मंत्रिमंडळातील नेत्यांनी आपले मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी त्या- त्या मतदारसंघांना विशेष महत्व देण्याचे काम केले आहे. त्यातच, ठाणे महापालिकेवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या काही महिन्यांनी संपणार आहे.

त्यामुळे जे काही महिने उरले आहेत. त्या महिन्यांत राष्ट्रवादीच्या एका वरीष्ठ नेत्याने मुंब्राला दिलेल्या शब्द पाळण्यासाठी विरोधीपक्ष नेते मुंब्र्याला बहाल केले आहे. त्यातून सध्या राष्ट्रवादीची आगीन गाडी कळवा येथून जवळपास साडेतीन वर्षांनंतर आता पुढे सरकून मुंब्र्यात गेली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रवास जसा अगला स्टेशन येतात. त्यातच कळव्यानंतर मुंब्रा हा कळवा- मुंब्रा विधानसभेच्या मतदारसंघात असल्याने तेथे राष्ट्रवादीची आगीन गाडी धावत आहे. आणि एका दगडात विरोधीपक्ष नेतेपद देत आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्याबरोबर तेथे आणखी वर्चस्व वाेढण्यासाठी हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्याप्रमाणे कोपरी- पांचपाखाडी या मतदारसंघात ही अडीच महापौर देत तो मतदारसंघ आभादी राखून हे मंत्रीमंडळांतील धुरंधर राजकारणी यशस्वी ठरताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -