Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेरस्ते, धुळीमुळे उल्हासनगरातील रहिवासी हैराण

रस्ते, धुळीमुळे उल्हासनगरातील रहिवासी हैराण

Subscribe

ठेकेदार अधिकार्‍यांना आयुक्तांकडून समज

उल्हासनगर । मनपा आयुक्त अजीज शेख आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करताना शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम आणि एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे, मनपा पाणीपुरवठ्याची कामे आणि बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली इतर रस्ते व नाल्यांची कामे यांची प्रगती, त्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी करताना ठेकेदार आणि सबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना कामाना गती देण्याची सूचना दिली. तसेच कामात हलगर्जी केल्यास कारवाईचा इशारा दिला.

या दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या सोबत महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, बांधकाम विभागाचे अभियंता तरुण सेवकानी व महानगरपालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सध्या सुरु असलेल्या विकास
कामाची गती वाढवण्यासाठी आयुक्तांनी कंत्राटदारास आणि सबंधित अधिकार्‍यांना सक्त निर्देश दिले आहेत. या शिवाय शहरात धुळीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रस्त्याची कामे तातडीने करण्याच्या सूचना देताना कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे आणि कामाची गुणवत्ता ठेवणे याबाबत निर्देश दिले आहेत. रस्त्यांच्या कामात हलगर्जी पणा खपून घेतला जाणार नाही अशी तंबी सबंधित अधिकार्‍यांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -