उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत एनयुएचएम या अभियानात काम करणार्या आशा सेविकांनी सोमवारी मनपा कार्यालयासमोर दिवाळी बोनससाठी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी 2100 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हे अनुदान दोन दिवसात आशा सेविकांना देण्यात येईल अशी माहिती शेख यांनी दिली.
उल्हासनगर महानगर पालिकेच्या एनयुएचएम अंतर्गत काम करणार्या 358 आशा सेविकांनी दिवाळी बोनसची मागणी केली होती. त्यासाठी दिवाळी पूर्वी आंदोलन देखील करण्यात आले होते. परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शेवटी आशा सेविकांनी पुन्हा पालिकेच्या मुख्य गेट समोर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला मनसे प्रणित कामगार कर्मचारी युनियन सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी पाठिंबा दिला.