घरठाणेमहापालिका आयुक्तांचे दौरे सुरूच, शहरातील स्मशानभूमींची केली पाहणी

महापालिका आयुक्तांचे दौरे सुरूच, शहरातील स्मशानभूमींची केली पाहणी

Subscribe

आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

गेले आठवडाभरापासून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दैनंदिन पाहणी दौर्‍यांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. मंगळवारी माजिवडा मानपाडा तसेच वागळे इस्टेट व उपवन येथील स्मशानभूमींची पाहणी करुन येथील कामाचा आढावा घेतला. स्मशानभूमीमध्ये आवश्यक असलेली दुरूस्तीची कामे, रंगारंगोटी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी माजिवडा स्मशानभूमी, मानपाडा येथील शिवाजीनगर स्मशानभूमींची पाहणी केली. स्मशानभूमीमध्ये साफसफाई, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच मानपाडा येथील शिवाजीनगर स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी बसविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच मानपाडा येथे असलेल्या ठामपाच्या दोन शाळांची पाहणी केली व शाळांमध्ये आवश्यक असलेल्या दुरूस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisement -

लोकमान्यनगर रायलादेवी प्रभागसमितीअंतर्गत येत असलेल्या जयभवानीनगर व वर्तकनगर प्रभागसमितीमधील उपवन येथील रामबाग स्मशानभूमीची देखील पाहणी केली. या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवणे, काही ठिकाणी डागडुजीची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करणे, या ठिकाणी अत्यंविधीसाठी येणार्‍या नागरिकांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देणे तसेच आसनव्यवस्था उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या फूटपाथच्या कामाची पाहणी व दुभाजकाच्या रंगरंगोटीची पाहणी केली.

या पाहणी दौर्‍यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिकत आयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता संजय कदम, प्रकाश खडतरे, महेश बहिरम, उपमुख्यस्वचछता निरीक्षक जयंत पटनाईक, तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -