घरठाणेदहा हजार साड्यांची मुरबाड तहसील कार्यालयासमोर होणार होळी

दहा हजार साड्यांची मुरबाड तहसील कार्यालयासमोर होणार होळी

Subscribe

आदिवासी क्रांती सेना आक्रमक

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने सध्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये 100 रुपयांमध्ये सहा प्रकारच्या अन्न धान्य किट देण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र यामध्ये अंत्योदय योजनेमध्ये असणार्‍या महिलांना देखील या रेशन सोबत साडी वाटप होणार आहे. मात्र याला आदिवासी क्रांती सेनेने आक्षेप घेतला आहे. त्यापेक्षा साडीच्या किंमतीत जादा रेशन द्यायला पहिजे होते. अशा प्रतिक्रिया आदिवासी बांधवांमध्ये व्यक्त होत असून त्यामुळे एक मार्च रोजी या सर्व वाटप झालेल्या एक हजार साड्यांची तहसील कार्यालयासमोर होळी करण्याचा निर्णय आदिवासी क्रांती सेनेने घेतला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना आखल्या आहेत.

या महिन्यात आनंदाचा शिधा या योजनेखाली शंभर रुपयांमध्ये सहा अन्नपदार्थ रेशनिंग दुकानांत मिळणार आहेत. यात पामतेल, पोहे साखर, मैदा,रवा, यांचा समावेश आहे. शिवाय अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलेला एक साडी मोफत देण्यात येणार आहे. या बाबीला आदिवासी क्रांतीसेना अध्यक्ष दिनेश जाधव यांनी विरोध केला आहे. त्यापेक्षा जादा रेशन दिले असते तर चांगले झाले असते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या साड्यांची एक मार्च रोजी मुरबाड तहसील कार्यालयासमोर होळी करून सरकारचा ते निषेध करणार आहेत. अनेक आदिवासी गावं, पाडे, वाड्या ह्या रस्ते, पाणी, या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष नाही, आदिवासींचे रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा निषेध अशा पद्धतीने नोंदविण्याचा त्यांनी मार्ग अवलंबला आहे. तालुक्यात एकूण 10949 इतक्या अंत्योदय शिधापत्रिका आहेत.

- Advertisement -

अनेक ठिकाणी आदिवासी वस्तीत रस्ता नाही. या साड्या देऊन त्याचा उपयोग रस्ता नाही, तिथे आजारी माणसाला डोली करून नेण्यासाठी आणि मासे झोलण्यासाठी साड्यांचा उपयोग होऊ शकतो.
-दिनेश जाधव, अध्यक्ष, आदिवासी क्रांती सेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -