घरठाणेपैशांच्या व्यवहारातून दिराकडून भावजयीची हत्या

पैशांच्या व्यवहारातून दिराकडून भावजयीची हत्या

Subscribe

शवविच्छेदनाच्या अहवालातून महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे उघड

टिटवाळ्या जवळील बल्याणी येथे जमिनीच्या वादातून दीराने भावजयीचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न केले असून रविवार ६ फेब्रुवारी रोजी घडलेला प्रकार टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा बदलून आणि शवविच्छेदनाच्या अहवालातून या महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे उघड केले आहे.

बल्याणी येथे राहात असणाऱ्या धुपदा जयराम वाघे (४०) असे मृतक महिलेचे नाव असून या महिलेने राहत्या घरात गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याबाबत पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद करीत पंचनामा करून याबाबत तपास सुरू केला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर आत्महत्या नसून गळा दाबून मारल्याचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

- Advertisement -

याबाबत मृतक धुपदा तिची बहीण आशा वाघे वासिंद जवळील भातसई येथे राहत असून तिने आपल्या बहिणीचा दीर सुरेश त्र्यंबक वाघे यांनी तिला मारले असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. टिटवाळा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी याबाबत सुरेशला चौकशी करीता ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने जागेच्या व्यवहारातून भावजयीची हत्या केल्याची माहिती दिली.

धुपदा राहात असलेले घर पडायला आले होते. मात्र ती जागा दुसऱ्या इसमाची होती घर बांधून देण्याची हमी तिला देण्यात आली होती. याबाबत संबंधित जागा मालकाने धुपदाच्या दिरास पैसे दिले असल्याने या व्यवहारातून दिर-भावजयी मध्ये नेहमी शाब्दिक चकमकी होत होत्या. सुरेश वाघे कडे नेहमी तगादा लावला असल्याने अखेर घरात कोणीच नसल्याचे बघून त्याने भावजयीचा गळा आवळून खून केला. मात्र ही आत्महत्या असल्याचे अगोदर भासवून शवविच्छेदनाच्या अहवालातून आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. अखेर टिटवाळा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी सुरेशला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविताच गळा आवळून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी अवघ्या तीन दिवसातच या प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -