वाहन चालकाच्या चुकीमुळे नागला बंदर आणि भाईंदर पाडा रात्रभर अंधारात

अपघातामुळे विद्युत खांबाच्या केबलला किरकोळ आग

Nagla port and Bhayandarpada have no electricity overnight Due to driver's mistake
वाहन चालकाच्या चुकीमुळे नागला बंदर आणि भाईंदर पाडा रात्रभर अंधारात

महावितरणाच्या दोन विद्युत खांबाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत विद्युत केबलला किरकोळ आग लागल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. वाहन चालकाच्या त्या छोट्या चुकीमुळे भाईंदर पाडा आणि नागला बंदर परिसरात अंधार झाल्याने तेथील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे ,घोडबंदर रोड नागला बंदर येथे रस्त्यावर असलेल्या महावितरणाच्या दोन विद्युत खांबांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्या खांबावरील विद्युत केबलला किरकोळ आग लागून दिवाळीच्या फटाक्यांसारखा आवाज होऊन ती केबल स्पार्क झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली आणि कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभाग, पोलीस आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने लागलेल्या किरकोळ आगीमुळे मात्र नागला बंदर आणि भाईंदर पाड्यातील लाईट रात्रभर गेली होती. ती संध्याकाळपर्यंत येईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्या वाहन चालकाच्या छोट्या चुकीमुळे शिक्षा रात्र नागला बंदर आणि भाईंदर पाड्यातील नागरिकांना रात्र अंधारात काढण्याची वेळ ओढवली होती.

या अपघातात कोणी जखमी झाले नाही. मात्र नागला बंदर आणि भाईंदर पाडा येथील विद्युत सेवा मात्र रात्रभर बंद होती.  – ठामपा आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम