ठाणे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत

all conversions cannot be illegal says sc on mp law

ठाणे जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयेकौटुंबिककामगारहकार व इतर न्यायालयांमध्ये  शनिवार ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहेजिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होईलअसे प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी कळविले आहे. राष्ट्रीय लोक अदालती मध्ये  दिवाणीफौजदारीवैवाहिक१३८ एनआय.अॅक्ट (चेक संबंधिचीअन्वये दाखल झालेली प्रकरणेबँक वसुली प्रकरणेमोटार अ़पघात नुकसान भरपाईकौटुंबिक वादकामगार विषयक वादभूसंपादन प्रकरणेवीज व पाणी विषयक देयक प्रकरणेमहसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेततसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत  ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर 022-25476441 वर संपर्क करावा. सर्व पक्षकारांनी प्रंलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी केले आहे.