नौपाडा पोलिसांनी हस्तगत केले 98 मोबाईल फोन

मुंब्र्यातील सराईत चोरट्याने दिली सहा गुन्ह्यांची कबुली

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

नौपाडा सारखा परिसरात जबरी चोरी, घरफोडी आणि गहाळ झालेल्या अशा एक नव्हे तर तब्बल 98 मोबाईलचा अचूक तपास करून ते मोबाईल फोन नौपाडा पोलिसांनी हस्तगत केले. यामध्ये घरफोडीचे 7, चोरीचे 4, जबरी चोरी 2 आणि इतर 17 असे मिळून 98 मोबाइल असून ते महाराष्ट्रातून नाहीतर कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यातून हस्तगत केलेले आहेत. याचशिवाय घरफोडी, चोरी, मोटारसायकल व लॅपटॉप चोरणार्‍या सराईत चोरट्याने सहा गुन्ह्यांची कबुली देत, त्या गुन्ह्यांमधील 4 लाख 66 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चोरीच्या घटनांची जणू मालिका सुरू झाली होती. तिच्यावर वेळीच आळा घालण्याबाबत परिमंडळ एक चे पोलीस उपआयुक्त गणेश गावडे यांनी केलेल्या काही सुचनेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आल्या होत्या. या पथकाने सीईआयआर पोर्टल व ऑनलाईन उपलब्ध टुल्स, मोबाइल शोध अ‍ॅपचा वापर करुन लोकशेन ट्रेस करुन तब्बल 98 मोबाईल फोनचा शोध घेत, ते हस्तगत केले आहेत. हे मोबाईल फोन महाराष्ट्रातूनच नाहीतर इतर राज्यातून हस्तगत केले आहे. यामध्ये कनार्टक 1, उत्तरप्रदेश 3, मध्यप्रदेश 2, गुजरात 1, मुंबई शहर 5, लातुर 1, पूणे 2 आणि जालना, बीड येथून 1 अशा पध्दतीने इतर जिल्हे आणि राज्यांचा समावेश आहे.

याचदरम्यान 20 फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी हे आपल्या परिवारासह राहत्या घरात दरवाजा बंद करुन झोपले होते. त्यावेळी अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश करुन 16 हजार रुपये किमंतीचे 4 मोबाइल फोन चोरी करुन पळून गेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळावरील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 3 टीम तयार करुन घटनास्थळापासून मुंब्रा पर्यंतचे सुमारे 30 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सलग तीन दिवस मुंब्य्रातुन शिताफीने अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी (27) रा. कौसा, मुंब्रा याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, 5 मोबाइल, एक लॅपटॉप, दोन मोटारसायकल असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याने नौपाडा 4, कळवा 1 व ठाणेनगर 1 असे एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील 5 मोबाइल फोन, एक लॅपटॉप, दोन दुचाकी असा 4 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.