घरठाणेकेवळ वेलनेस, नोबेलसाठीच काढले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मेडिकल दुकानाचे टेंडर

केवळ वेलनेस, नोबेलसाठीच काढले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मेडिकल दुकानाचे टेंडर

Subscribe

ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालय नेहमीच गैरकारभारमुळे चर्चेत असते. आता या रुग्णालयातील मेडिकल स्टोअर भाडेतत्वावर देण्यासाठीच्या निविदा या वेलनेस किंवा नोबेल या औषध विक्रेत्यांना फायदेशीर ठरण्याच्या उद्देशानेच काढण्यात आल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज रुग्णालयातील मेडिकल भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा काढल्यापासून त्या सादर करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. तसेच; ज्यांची 30 मेडीकल शॉप्स असणे; वर्षाची आर्थिक उलाढाल 120 कोटींच्या घरात असणे; अशा सामान्य औषध विक्रेत्यांना सहज साध्य न होणार्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. या अटींच्या माध्यमातून बड्या भांडवलदारांनाच गोरगरीबांना औषधे विक्री करण्याचा परवाना रुग्णालयात देण्यात येणार आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री ट्वीट करून ठामपा प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. आज आनंद परांजपे यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना निवेदन देऊन निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या संदर्भात आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा व्हावी, अशी मागणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तेथे येणार्‍या गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र, तेथे डॉक्टरांसह अनेक पदे रिक्त आहेत. तेथील मेडीकल स्टोअरदेखील गेली 10 वर्षे बंद होते. ते सुरु व्हावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची होती. दुर्देवाने ते चालू करण्यासाठी जी निविदा काढण्यात आली. ही निविदा विशिष्ट कंपनीनेच भरावे आणि त्यांना मिळावे, अशा पद्धतीच्या अटी-शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. मागील तीन वर्षाची उलाढाल 120 कोटींची असावी; ठाणे परसिरात 30 दुकाने असावित; जेव्ही करावयाची असल्यास ती 28 फेब्रुवारीच्या आतली असावी, अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, ठाण्यातील सामान्य औषध विक्रेत्याला ही निविदा दाखल करता यायला हवी. पण, ज्या दिवशी 24 मार्चला ही निविदा जाहीर झाली. त्याच दिवशी कळवा केमीस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशने आयुक्तांना पत्र देऊन अटी शर्ती जाचक असून त्या बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, वेलनेस किंवा नोबेल यांच्या फायद्यासाठीच ही निविदा काढण्यात आलेली आहे. ठाण्यातील कोणताही औषधविक्रेता ही निविदा भरु शकत नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करावी; ठाणेकरांना लाभ होईल, असा निर्णय आयुक्तांनी घ्यावा.

- Advertisement -

नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दौरे सुरु केले आहेत. ही आनंदाची बाब आहे. मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देऊन कशी स्थिती आहे, याची पाहणी करावी. या निविदेबाबत आम्ही शासनाकडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार आहोत. कारण, अनेक निविदा या विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी काढण्यात ठामपाचे अधिकारी आघाडीवर असतात, हा इतिहास आहे, असा आरोपही आनंद परांजपे यांनी केला.


Air Force Planes Collide : दक्षिण कोरियात वायुसेनेच्या दोन विमानांची भीषण टक्कर, ३ वैमानिकांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -