Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे जलवाहिनीतील कोट्यवधींचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उघड

जलवाहिनीतील कोट्यवधींचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उघड

ठाणे महापालिका अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे ठेकेदारांकडून ठामपाला गंडा घातला जात असल्याची धक्कादायक बाब ठामपा विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी उघडकीस आणून ठाणे महानगर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे.

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिका अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे ठेकेदारांकडून ठामपाला गंडा घातला जात असल्याची धक्कादायक बाब ठामपा विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी उघडकीस आणून ठाणे महानगर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे. कल्याण फाटा ते दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत जुन्या जलवाहिन्या टाकून एम. के. ई. इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांनी ठामपाकडून ८ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे, याच कंपन्यांना ठाणे शहरात अन्य ठिकाणी सुमारे २०० कोटी रुपयांची कामेही दिली असून त्या कामांची चौकशी करून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एम. के. ई. इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे साहित्य वापरले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी कल्याण फाटा येथे जाऊन पाहणी केली. या पाहणीत ठिकाणी टाकण्यात आलेले पाईप्स हे जुने असल्याचे निदर्शनास आले. या पाईप्सवर चक्क २०१० साल नोंदविण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

अवघ्या ३० रुपये किलोने हे पाईप खरेदी करुन ठेकेदाराने ठामपाला गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या अधिकार्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. ठाणेकरांच्या पैशांची कशा पद्धतीने लूटमार केली जात आहे. हे या प्रकारातून उघडकीस आले आहे. ठेकेदार आणि काही अधिकार्यांच्या साटेलोट्यांमुळे ही लूट सुरु आहे. ठाणेकरांचा पैसा कसा वाया घालवला जात आहे, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे. आता ठेकेदाराकडून या जलवाहिन्या बुजविण्यात येणार आहेत. जर, या जलवाहिन्या बुजवण्यात आल्या तर पुरावेही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आणि महापौरांनी तत्काळ याची पाहणी करुन संबधित अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, एम. के. ई. इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांना ठाणे शहरात देण्यात आलेल्या २०० कोटींच्या कामांची तत्काळ चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते पठाण यांनी केली आहे.

हेही वाचा –

लोकांच्या प्रश्नांसाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे – फडणवीस

- Advertisement -