Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला कल्याण जिल्हाध्यक्षच नाही

तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला कल्याण जिल्हाध्यक्षच नाही

Subscribe

कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांनी प्रकृतीवस्था ठीक नसल्याचे कारण देऊन जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तीन महिन्यापूर्वी दिला होता. पदाचा राजीनामा दिल्याने जिल्हाध्यक्ष पदाविना राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार रामभरोसे चाललेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून आप्पा शिंदे यांना राज्यभर ओळखले जात असून ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी कल्याण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा फेब्रुवारी महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याने कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. राजीनामा पत्रात शिंदे यांनी प्रकृती साथ देत नसल्याचे कारण दिले असले तरी देखील त्यांचा राजीनामा गेल्या तीन महिन्यापासून जयंत पाटील यांच्याकडे पडून आहे.

एकीकडे राज्यात महाविकास आघाडी, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणुकीत चारी मुंड्याचित करण्याचे धोरण आखत मोट बांधण्यासाठी सरसावली असतानाच कल्याण राष्ट्रवादीचा मुख्य चेहर्‍याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का भविष्यात बसणार असल्याची चिंता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. माजी आमदार असलेले अप्पा शिंदे यांचा पुतण्या निलेश शिंदे शिवसेनेचे कल्याण पूर्व येथील नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसला कल्याण शहरात सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय शिंदे यांनी सुरू करून त्याचे उद्घाटनही जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा संख्येने चांगले नगरसेवक निवडून आणू अशी ग्वाही देत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र तीन महिन्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कार्यकर्त्यांना अचंबित करून टाकले आहे. देश पातळीवर मेडिकल असोसिएशनचे दमदार कार्य सुरू असताना त्यातच दर आठवड्याला मेडिकलला दवा उपचारासाठी आणि ऑपरेशन करिता रुग्णांना भरघोस मदत आप्पा शिंदे करीत असल्याने जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून रुग्णांचे नातेवाईक मदती करिता त्यांच्याकडे येत असतात. शिंदे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठ्या सन्मानाने नाव घेतले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष पदाचा प्रकृती ठीक नसल्याचे कारण देऊन राजीनामा तीन महिन्यापूर्वी देवू केला आहे. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केला नसला तरी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात ते भाग घेत नसल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -