घरठाणेराष्ट्रवादीमुळेच महापौरपद बिनविरोध, म्हस्केंनी विसरू नये - राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद परांजपे...

राष्ट्रवादीमुळेच महापौरपद बिनविरोध, म्हस्केंनी विसरू नये – राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा टोला

Subscribe

महापौरपदाच्या निवडणूकवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केल्याचा आरोप परांजपे यांनी केला आहे.

राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असलेल्या दोन पक्षांची खडाजंगी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत पहायला मिळाली हेती. ठाणे महानगरपालिकेची महासभाच्या ऑनलाईन माध्यमातून होत असताना आम्हाला बोलू दिले जात नाही आणि आमचा आवाज म्यूट केला जातो असा आरोप करत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी थेट पालिका सभागृहात धडक दिली होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेनेतील सर्व नेत्यांना धारेवर धरले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी अम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नसल्याचे विधान केले होते.

राष्ट्रवादीमुळेच नरेश म्हस्के बिनविरोध महापौर झाले आहेत. त्यांना आता याची आठवण नसेलच; म्हणून आम्ही ती आठवण करुन देत आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे विधान केले होते. आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के ज्या वेळी महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. आसा आरोप परांजपे यांना केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१९ रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी आपणांसह गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी”, अशी विनंती केली. त्यावेळी राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध पद्धतीने दिले. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१९ रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. असे खळबळजनक खुलासा परांजपे यांनी केला आहे.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीत असतानाही राष्ट्रवादीने ठाण्यात सत्ताधार्‍यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. त्याबद्दल आनंद परांजपे यांनी, “ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. अन् ती आम्ही करीत आहोत. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला आहे आणि शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता.कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरु असताना सचिवांकडून महापौरांच्या इशार्‍यावरुन आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहचावा, यासाठी नरेंद्र सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसल्याचे त्यांना सांगीतले.

 

महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन होते. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून लसीकरण होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लसीसाठी मागणी केली की ती नाकारली जाते. लसीकरणाच्या ज्या चार बसेस आहेत. त्यापैकी दोन प्रशासनाने ठेवल्या आहेत. तर, दोन बसेस महापौरांनी स्वत:च्या अधिकारात ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्या बसेसदेखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आल्या नाहीत, म्हणूनच काल हा आक्रोश झाला. काल सभागृह नेते अशोक वैती यांनीदेखील कोविडच्या कार्यकाळात मोठमोठ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहेत, असा आरोप केला आहे. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत आहेत. आणि सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नाही. त्यामुळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महासभेत आणि ठाणेकरांसमोर चुकीच्या निर्णयाचा विरोध करेल, असा इशाराही दिला.

हे ही वाचा- लसीकरणात भेदभाव केल्याचा आरोप; ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महासभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -