घरठाणेठाणे जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे रुग्ण तीन हजारांच्या जवळ

ठाणे जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे रुग्ण तीन हजारांच्या जवळ

Subscribe

दहा रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात बुधवारी ही कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन हजारांच्या आसपास गेल्याचे दिसत आहे. बुधवारी कोरोनाच्या दोन हजार ८६९ रुग्णांची नोंदणी झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत ५०० हून अधिक रुग्ण सापडले. भिवंडी आणि उल्हासनगर वगळता अन्य महापालिका आणि नगरपालिका तसेच ग्रामीण भागात १०० च्या वरती रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबईत सर्वात जास्त तिघा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उल्हासनगर येथे रुग्ण कमी झाले असताना इतर ठिकाणी रुग्ण वाढले आहेत. असे शासकीय आकडेवारीवरून दिसत असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात सापडलेल्या २ हजार ८६९ रुग्णांमुळे आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ९६ हजार २३ इतकी झाली असून सहा हजार ४१३ जण दगावले आहेत. ठामपा कार्यक्षेत्रात ७९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ७१ हजार ०१० इतकी झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४३२ झाली आहे.
कल्याण – डोंबिवलीत सर्वाधिक ८८१ रुग्णांची वाढ झाली असून आजची मृत्यू संख्या २ आहे. नवी मुंबईत ५१९ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू संख्या तिघांचा झाला आहे. उल्हासनगरमध्ये ७१ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ४३ बाधीतांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मीरा भाईंदरमध्ये १८० रुग्ण आढळले असून दोघे दगावले आहेत. अंबरनाथमध्ये १०८ रुग्ण सापडले आहेत. तसेच दोघे दगावले आहेत. कुळगाव- बदलापूरमध्ये १५९ रुग्णांची नोंद झाली असून ठाणे ग्रामीणमध्ये ११५ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात बाधितांचा आकडा हा २० हजार ५८३ झाला असून ६०३ जणांचा मृत्यू आहेत. तर, दिवसभरात भिवंडी,अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि ठाणे ग्रामीण या भागात या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -