घरठाणेठाणे महापालिकेची नवीन नियमावली जाहीर; शनिवार-रविवारी ठेवावी लागणार दुकाने बंद

ठाणे महापालिकेची नवीन नियमावली जाहीर; शनिवार-रविवारी ठेवावी लागणार दुकाने बंद

Subscribe

मंगळवार पासून दुकाने सकाळी ७ ते ११ च्या ऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच होम डिलिव्हरीची मुभा कायम ठेवताना अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने मात्र दुपारी २ नंतर तसेच शनिवार आणि रविवारी बंद ठेवावी असे नमूद केले आहे.

कोरोनाबाधितांचा दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषणा करण्यात आली असल्याने ठाणे महापालिकेने सोमवारी लॉकडाऊन संदर्भात आपली स्वतंत्र नियमावली जाहीर करत व्यापाऱ्यांना दिलासा काही अंशी प्रयत्न केला आहे. मंगळवार पासून दुकाने सकाळी ७ ते ११ च्या ऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच होम डिलिव्हरीची मुभा कायम ठेवताना अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने मात्र दुपारी २ नंतर तसेच शनिवार आणि रविवारी बंद ठेवावी असे नमूद केले आहे. तसेच गर्दी लक्षात घेता,मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्सला परवानगी नाकारण्यात आली आहे.याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती देखील २५ टक्केच ठेवावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनची मुदत ही ३१ मे रोजी संपुष्ठात आल्याने नवीन नियमावलीमध्ये कशाप्रकारे निर्बंध शिथिल करणार याकडे सर्वांचेच विशेष करून व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते. पूर्वीच्या नियमाप्रमाणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र चार तासांमध्ये व्यवसाय होत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून दुकानांची वेळ वाढवून देण्याची सतत मागणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याचे जाहीर केले असले तरी काही अंशी निर्बंध शिथिल करण्याची घोषणा देखील केली होती. यामध्ये ज्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे आणि ज्या शहराचा कोरोना बाधितांचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्ह्णून घोषणा करण्यात आली असल्याने ठाणे महापालिकेने ही स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.

- Advertisement -

ठाण्याच्या कोरोनाग्रस्त दर ७.८६ टक्के
ज्या महापालिका क्षेत्रांचा कोरोनाग्रस्त दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा पालिका क्षेत्रात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाग्रस्त दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असून हा दर सरासरी ७.८६ टक्के असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे शहराला निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

८५ टक्के ऑक्सिजन बेड्स रिकामे
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त दर हा कमी झाल्याने उपलब्ध बेड्सची आणि विशेष करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची उपलब्धता देखील जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये ८५ टक्के ऑक्सिजन बेड्स,७४ टक्के व्हेंटीलेटर्स बेड्स आणि ७४ टक्के आयसीयु बेड्स उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -