नवे वर्षे महापालिका कर्मचार्‍यांसाठी कारणे दाखवा नोटिसांचे

साठ दिवसात सापडले 75 कर्मचारी

बेशिस्त व कामचुकार, सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लागावी, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. तर यावर्षात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात कामावर उशिरा येणे, 3 पेक्षा अधिक दिवस गैरहजर राहणार्‍या 75 कर्मचार्‍यांना पालिका प्रशासनाने करणे दाखवा नोटीसा बजावली आहे. या आकडेवारीवरून प्रतिदिन अंदाजे एका कर्मचार्‍याला नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे हे वर्षे नोटिसाचे असेच म्हणावे लागणार आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालय, आरोग्य विभाग अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना आढळून येत आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्याने वेळेतच कर्तव्यावर हजर राहावे असा नियम आहे.

असा नियम असताना, या नियमाला फाटा देत, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या संदर्भात आस्थापना विभागाने निर्देश दिले असून त्यानुसार अशा कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलावीत असे सांगितले गेले आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या संदर्भात पावले उचलण्यात आली आहेत. पालिका कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी आणि कामावर वेळेत येण्यासाठी महापालिकेमार्फत सध्या मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या विरोधात कडक पावले उचलीत पालिकेने मस्टरच गायब करुन उशिराने येणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात कामावर उशिरा येणे, 3 पेक्षा अधिक दिवस गैरहजर राहणार्‍या 75 कर्मचार्‍यांना पालिका प्रशासनाने करणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक 45 कर्मचार्‍या नोटीसा बजाविण्यात आल्या असून फेब्रुवारी आतापर्यंत 30 कर्मचार्‍यान नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती देखील पालिका सूत्रांनी दिली.