घरठाणेयेत्या रविवारी प्लस पोलिओ लसीकरण 

येत्या रविवारी प्लस पोलिओ लसीकरण 

Subscribe

ठाणे जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार २८ मे २०२३ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी व कल्याण तालुक्यात तसेच नगरपालिका बदलापूर, अंबरनाथ क्षेत्रात राबवण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार तालुक्यातील ५ वर्षापर्यंतच्या एकूण १ लाख ०८ हजार ७७५ बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत पोलिओची लस देण्यात येणार आहे. तसेच बदलापुर, अंबरनाथ क्षेत्रातील एकूण ६८ हजार ५९५  बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

मोहिमेत ग्रामीण व नगरपालिका बदलापुर, अंबरनाथ क्षेत्रात एकूण १ हजार ४१८ बुथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये एकूण ३ हजार ४७८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. रविवारी बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांना ग्रामीण कार्यक्षेत्रात ३ दिवस व नगरपालिका कार्यक्षेत्रात ५ दिवस कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओचे लसीकरण करणार आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे
यांनी दिली.

- Advertisement -

तसेच ही मोहिम यशस्वी करण्याकरिता मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त पालकांनी आपल्या बालकांचे पोलिओ लसीकरण करून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये येत्या रविवारी २८ मे २०२३ रोजी लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तरी पालकांनी 0 ते 5  वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे  असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -