ठामपाचा कोरोना आकडा आला शून्यावर

जिल्ह्यात २१ दिवसात तिघे दगावले

 एकीकडे कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत सोमवारी दिवसभरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर गेल्या तीन दिवसात ठामपामध्ये अवघ्या तीन रुग्ण आढळून आले असून शनिवारी दोन आणि रविवारी एक रुग्णाची नोंद झाली होती. तर जिल्ह्यात ही सोमवारी अवघे तीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही १५२ इतकी झाली आहे. तसेच मागील २१ दिवसात अवघे तिघे दगावल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिला.
 मार्च महिन्यातील २१ दिवसात ३५३ रुग्ण आढळून आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहेत. तसेच जवळपास ३५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात अवघे तीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये कल्याण-डोंबिवलीत दोन तर मीरा भाईंदर येथे एक रुग्ण नोंदवला गेला आहे. यामध्ये ठाणे, नवीमुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर आणि ठाणे ग्रामीणमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
अखेर सोमवारी ठामपा @ शून्य
एकीकडे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिका तसेच ठाणे ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांनी शून्याचा आकडा गाठला असताना, ठामपाने अखेर सोमवारी शून्यचा आकडा गाठला आहे. एकीकडे दोन आकडी, एक आकडी आल्यानंतर ती संख्या दोन, एक करत शून्यावर आल्याचे दिसत आहे.