घरठाणेगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बनावट ट्विटर अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बनावट ट्विटर अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट

Subscribe

शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटर अकाउंटवर छेडछाड करून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, वर्तक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अधिकृत असलेल्या ट्विटर अकाउंट मध्ये अज्ञात व्यक्तीने छेडछाड करून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट उघडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बोगस ट्विटर अकाउंटवर गृहनिर्माण मंत्री यांचा फोटो लावून शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. हा प्रकार आव्हाड यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात येताच त्यांनी हि बाब जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपल्या नावाचा वापर करून शिवसेनेच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकून सरकारमध्ये भांडणे लावून देण्याचा हा प्रकार असल्यामुळे आव्हाड यांनी मंगळवारी ठाणे मधील वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून ट्विटर ला पत्राद्वारे हि पोस्ट हटवण्याची विनंती केली आहे. हे बोगस ट्विटर अकाउंट तयार करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेण्यासाठी वर्तक नगर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेची मदत घेत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती वपोनि गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -