घरठाणेसिलिंडर स्फोटात वृद्ध जखमी

सिलिंडर स्फोटात वृद्ध जखमी

Subscribe

स्फोटात घराच्या छतावरील पत्रे उडाले

गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजून जखमी झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात घडली. हनुमंत मोरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उमेश नगर देवीचा पाडा येथील काशिनाथ निवास मध्ये राहणारे हनुमंत मोरे रविवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे उठले. सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी त्यांनी लाइटर पेटविला असता सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये हनुमंत मोरे हे जवळपास 40 भाजले असून त्यांना शेजार्‍यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

त्यानंतर त्यांचा मुलगा श्रीनिवास मोरे यांना माहिती मिळताच त्यांनी जखमी वडिलांना मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले आहे. पहाटेच्या वेळी झालेला हा सिलेंडरचा टाकीचा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात घराच्या छतावरील पत्रे उडाले. तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले, अस्ताव्यस्त झाले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -