घरठाणेभातसा धरणाची सुरक्षा ऐरणीवर; धुडगूस घालणाऱ्या मद्यपींना  पोलिसांनी दिला चोप

भातसा धरणाची सुरक्षा ऐरणीवर; धुडगूस घालणाऱ्या मद्यपींना  पोलिसांनी दिला चोप

Subscribe

  स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसानी केली  कारवाई  

कोरोनाच्या महामारीमुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास ठाणे जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली आहे. तरी देखील शासकीय नियम धुडकावून लावीत शनिवारी, रविवारी सहलीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर शहापूर तालुक्यातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या परिसरात गर्दी करताना दिसत आहेत. रविवारी भातसा धरणालगत काही हौशी पर्यटक आणि मद्यपींच्या टोळक्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला होता. जवळपास तीनशेहून अधिक लोकांनी धरण क्षेत्रात एकच गर्दी केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी भातसा धरणालगत धाव घेताच धरणक्षेत्रात धुडगूस घालणाऱ्या मद्यापींची दारुची झिंग उतरली.

पोलिसांनी काहीजणांना तर लाठ्यांचा चोप देत हुसकावून लावले. पोलीस आल्याची खबर लागताच दारुड्यांची एकच पळापळ झाली. काहीजण पळून गेले. अनेकांनी आपली वाहने घेऊन कारवाईच्या भीतीने तर पळ काढला. शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव, पोलीस नाईक थाळेकर, राठोड, महिला पोलीस कुटे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसानी केली  कारवाई. भातसा धरण येथे रविवारी दारू पिऊन धिंगाणा घालणा-या मद्यपी टोळक्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता.  धरणाजवळ काही जण दारू पिऊन रस्त्यावर  नाचत असतात धरणालगतच्या  रस्त्याने साजिवली, भातसानगर, सावरशेत, सारंगपुरी येथून स्थानिक लोकांना ये-जा  करावी लागते, या गावांना येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे.

- Advertisement -

तसेच शासकीय, प्रवासाची सोय नसल्याने अनेक नागरिक, महिला पायी चालत जातात. ग्रामस्थांना या मद्यपींच्या त्रासला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेत रविवारी मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला. पर्यटनाच्या नावाने येथे लोकांचा वावर वाढल्याने अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाची सुरक्षा ही आता धोक्यात सापडली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा हे धरण राज्यसरकारच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार क्षेत्रात असल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेसाठी जलसंपदाने सुरक्षा रक्षक महामंडळाचे एकूण २१ सुरक्षा रक्षक व ८ पोलीस  तैनात केले आहेत. असे असतानाही धरण व परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि मद्यपी टोळक्यांना मज्जाव घातला जात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.

 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -