घरठाणेआंबिवलीतील दीड एकर भात शेती रासायनीक रद्दीच्या ढिगाऱ्याखाली

आंबिवलीतील दीड एकर भात शेती रासायनीक रद्दीच्या ढिगाऱ्याखाली

Subscribe

यापूर्वी या शेतीमध्ये बाराही महिने विविध भाजीपाल्याची लागवड केली जात होती. परंतु वेस्टेज केमिकल रद्दीने भातशेतीवर कब्जा करीत रद्दीची चादर याठिकाणी पसरून ठेवली आहे

आंबिवली गावातील बाळकृष्ण पेपर मिल या कारखान्यातील टाकाऊ कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पाण्याच्या प्रवाहाने सरळ भातशेतीत शिरकाव केला. त्यामुळे या शेतीवर उपजीविका करणाऱ्या येथील शेतकऱ्याचे लागवड करूनही नुकसान होत असल्याने ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण तहसीलदार यांच्याकडे न्याय मागत कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.खारी आंबिवलीतील बाळकृष्ण पेपर मिल हा कारखाना कागद बनविण्यासाठी सुप्रसिद्ध असून कारखाना आवाराच्या बाहेरील जागेत प्रक्रियेत रद्दी झालेल्या कागदांचा चुराडा डम्पिंगच्या ढिगाऱ्यावर टाकला जात आहे.

 

- Advertisement -

ढिगाऱ्याच्या दोनशे मीटरच्या अंतरावर दीड एकर शेती असून पावसाळ्यात पेरणी करूनही टाकाऊ केमिकलयुक्त रद्दीने जमिनीचा ताबा घेतल्याने भात शेती उगवण्याची प्रक्रिया खंडीत झाली आहे.या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांना याबाबत विचारणा केली असता, मला ते बघावे लागेल, कंपनी मला माहित असून रेकॉर्ड पडताळून सोमवारी किंवा मंगळवारी निश्चितपणे तुम्हाला माहिती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना या तक्रारी संदर्भात विचारणा केली असता तलाठ्यांना पाहणी करण्याचे सांगून तसा अहवाल सादर करण्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी या शेतीमध्ये बाराही महिने विविध भाजीपाल्याची लागवड केली जात होती. परंतु वेस्टेज केमिकल रद्दीने भातशेतीवर कब्जा करीत रद्दीची चादर याठिकाणी पसरून ठेवली आहे.

 

- Advertisement -

कंपनीच्या व्यवस्थापकाला भात शेती करणाऱ्या हरिश्चंद्र दामोदर पाटील, सुनिल सुकर्‍या चौधरी आणि अन्य शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याची माहिती दिली आहे. बाळकृष्ण पेपर मिल या कारखान्याकडे सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र नाला नसून रद्दीच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याचा रद्दीचा मोठा ढिगारा निर्माण केला जात आहे. नाला नसल्याने सांडपाणी व कचऱ्याची केमिकलयुक्त रद्दीने शेतीच कायम स्वरूपी निकृष्ट झाल्याची माहिती शेतीवर उपजीविका करणारे हरिश्‍चंद्र पाटील यांनी दिली आहे. बाळकृष्ण पेपर मिल च्या स्थापनेच्या ६० वर्षापासून सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाला बांधला नसून पूर्वी केमिकलयुक्त सांडपाणी वाहत होते. परंतु आता डम्पिंग ढिगाऱ्यातून रद्दीने ही जागा घेतल्याने बाजूलाच असलेल्या सुमारे दीड एकर शेत जमीन निकृष्ट बनली आहे.

 

पावसाळ्यात भात शेतीत रद्दीचा कचरा जमा झाल्याने लावण्यात आलेले पीक वाहून जात आहे. अर्ध्या किलोमीटर अंतरावर काळू नदीची खाडी वाहत असून प्रक्रिया न केलेले केमिकलचे पाणी या खाडीत सोडले जात आहे. या बाबीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा बरोबर संबंधित शासकीय अधिकारी वर्गाकडे तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गाने केला आहे. यासंदर्भात बाळकृष्ण पेपर मिलचे जनरल मॅनेजर अतुल भारती यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

 

हे ही वाचा- मुंब्य्रातील लसींचा काळाबाजार; केंद्रप्रमुख डॉक्टरावर निलंबनाची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -