Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे नील तलावात आणखी एकाचा मृत्यू तर एकाला वाचवण्यात मित्रांना यश

नील तलावात आणखी एकाचा मृत्यू तर एकाला वाचवण्यात मित्रांना यश

रविवारी ठाण्यात तिघा घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू

Related Story

- Advertisement -

 येऊरच्या पटोनापाडा येथील नील तलावात राबोडी मधील जुबेर सय्यद (२०) याचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला तर अब्दुल हन्नन (२६) याला वाचविण्यात त्याच्या मित्रांना यश आले आहे. रविवारी ठाण्यात तिघा घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे. यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

राबोडी बापूजी नगर येथे राहणारा मयत जुबेर आणि बचावलेला अब्दुल असे सहा मित्र येऊरच्या नील तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुबेर आणि अब्दुल या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. याचदरम्यान अब्दुल याला वाचविण्यात त्याच्या मित्रांना यश आले. मात्र, जुबेर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच आपत्ती, अग्निशमन आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्य सुरू केल्यावर जुबेर याचा मृतदेह साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास मिळून आला. त्यानंतर, त्याचा मृतदेह ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -