Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे  सुमारे १० हेक्टर भूखंडाने घेतला अतिक्रमणातून मुक्त श्वास

 सुमारे १० हेक्टर भूखंडाने घेतला अतिक्रमणातून मुक्त श्वास

Subscribe

कळवा कारगिल कोंडा येथील एक हजार ५३ अतिक्रमणे हटवली

दरवर्षी पावसाळ्याच्या काळात डोंगर खचून अथवा दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना घडतात, त्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी जावू नये, यासाठी ठाणे वन विभागाने खबरदारी घेत, चांगली कंबर कसली आहे. गेल्या पंधरावड्यात कारगिल कोंडा येथील एक हजार ५३ अतिक्रमणांवर कारवाई करीत, सुमारे १० हेक्टर भूखंड अतिक्रमण मुक्त करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली. तसेच डोंगर उतारावरील अतिक्रमनांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे देखील वन विभागाने स्पष्ट केले आहे.  ठाणे शहराला लाभलेल्या गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगररांगावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घरे उभारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागच्या जागेत बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार १६ मे आणि १७ मे या दोन दिवसात ४७५ अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करीत ६.५ हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त केली होती.तर गुरुवार २५ मे रोजी पुन्हा याच भागातील अनधिकृतपणे नव्याने उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांच्या विरोधात सहा वन संरक्षक हिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले, वनपाल सचिन सुर्वे, वनरक्षक अनिल भामरे तसेच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागासह पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत ५७८ अनधिकृत झोपड्यांवर वन विभागाच्या माध्यामतून बुलडोझर फिरवला असून ४.७१० हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. यापुढे वन विभागाच्या जागेत उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांना वीज जोडणी देवू नये, यासाठी टोरंट कंपनीला तर, नळ जोडणी देण्यात येवू नये याकरिता ठाणे पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाने दिली.

- Advertisement -

” कळवा कारगिल कोंडा या वन परिक्षेत्रातील वन विभागच्या जागेवर अतिक्रमन करणे कायद्याने गुन्हा आहे. गुरुवारी देखील या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली असून ती जागा अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिक्रमण होवू नये, याकरिता दिवस व रात्र अशा दोन्ही वेळी गस्त घालण्यात येणार आहे. “-  दिनेश देसले, वनक्षेत्रपाल अधिकारी, ठाणे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -