घरठाणेओपन डेटा सप्ताहाचा ठाणे महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत होणार समारोप

ओपन डेटा सप्ताहाचा ठाणे महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत होणार समारोप

Subscribe

तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लि. आणि ठाणे महापालिकेच्यावतीने ‘ओपन डेटा सप्ताह’ गेला आठवडाभर सुरू असून या कार्यक्रमाचा समारोप २१ जानेवारी २०२२ रोजी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वा ठाणे कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे स्मार्ट सिटी लि. चे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
या ओपन डेटा सप्ताह समारोप कार्यक्रमात या सप्ताहाबाबत व ओपन डेटा या संदर्भात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ तथा स्मार्ट सिटी लि.चे अध्यक्ष संदीप माळवी, निती आयोगाचे मार्गदर्शक संदीप कुपेरकर, कम्युनिटी लीड ॲट पोस्टमन अली मुस्तफा शेख, पॅलेडियम कन्स्लटींग इंडिया प्रा.लि. नॅशनल अध्यक्ष अमित पटजोशी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच पाण्याचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षितता, आरोग्य, डिजीटल कनेक्टीव्हीटी या विषयावर हॅकेथॉन आणि स्टार्टअप पीचफेस्ट हे कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होणार असून या कार्यक्रमादरम्यान सादर केल्या जाणाऱ्या प्रात्याक्षिकांचा पारितोषिक वितरण सोहळा महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याहस्ते होणार असल्याचे ठाणे स्मार्ट सिटी लि.चे अध्यक्ष संदीप माळवी यांनी नमूद केले.

- Advertisement -

केंद्र शासनाने १०० शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड केली असून यामध्ये नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी ओपन डेटा सप्ताह हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातंर्गत शासनाच्या ओपन डेटा धोरणाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. या ओपन डेटा उपक्रमाचा मुख्य उद्देश स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करणे असा असून ज्या शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे, त्यांच्यामार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग आणि एपीआय अपलोड केले आहेत. यानुसार ठाणे स्मार्ट सिटी लि.च्या मदतीने ठाणे महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर ७० पेक्षा जास्त डेटासेट अपलोड केले आहेत, ज्याचा सर्व भागधारक जसे की शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा ठाणे शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत होणार आहे.

हा ओपन डेटा कोणीही ऍक्सेस करु शकतो, वापरु शकतो आणि शेअरदेखील करु शकतो. नागरिकांपासून उद्योजकांपर्यत संशोधक आणि व्यवसायांपर्यत, कोणीही कोणत्याही कारणास्तव याचा वापर करु शकतो. या माध्यमातून नागरिक प्रशासन किंवा महानगरपालिकेला आपले अभिप्राय देखील देवू शकतात. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी याचा वापर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -