घर ठाणे रखडलेला मुंबई - गोवा हायवे दिरंगाई विषयावर खुले चर्चासत्र

रखडलेला मुंबई – गोवा हायवे दिरंगाई विषयावर खुले चर्चासत्र

Subscribe

  मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे , १२ वर्षे का रखडले काम ? जर ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम होते मग कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही ? निधीची कमतरता नसताना का रखडला ?  या आणि अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून या विषया बाबत माहिती जाणून घेण्यासाठी एक खुले चर्चा सत्र येत्या रविवारी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले आहे. गेली १२ वर्षे मुंबई गोवा महामार्ग वगळता कोणत्याही महामार्गावर अपघात झाला तर त्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेतली जाते,तातडीने मदत जाहीर केली जाते; मात्र कोकणच्या अपघातग्रस्तांवर अन्याय का? या सर्वांना जबाबदार असलेल्या अधिकारी, राजकारणी,लोकप्रतिनिधी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही ? मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्या शिवाय टोल आकारणी सुरु करू नका! अशी मागणी असताना टोल सुरु झाले. या व अशा अनेक विषयांवर विविध संघटनांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांवर आंदोलने केली गेली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या एक वर्षात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आठ वेळा पाहणी करून विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला आहे. या कामातील असंख्य अडचणी हुडकून काढल्यामुळेच आता मुंबई गोवा महामार्ग कामाला गती आली असून पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

- Advertisement -

कोकणच्या विकासाच्या प्रवाहातील मुख्य नाळ असलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या अराजकीय – सामाजिक संस्था, पत्रकार यांच्याकडे त्यांचे मनातील मुंबई – गोवा हायवेचे कामाबाबत काही मुद्दे असतील तर महामार्गाचे काम अधिक सुसाट वेगाने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी मंत्री रवींद्र  चव्हाण यांनी खुल्या चर्चा सत्रात आपणास आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कोकणवासीय चाकरमान्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे ,असे आवाहन जयवंत दरेकर व काका कदम यांनी केले आहे. हे खुले चर्चासत्र ठिकाण डोंबिवली जिमखाना, पेंढारकर कॉलेज समोर, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. आपली नावे नोंदविण्यासाठी जयवंत दरेकर(९८२१५६२५७७), काका कदम (७५०६२५४४४५) , अक्षय महापदी (८०९७१६७९८७) ,राजू मुलुख(८४५१०९७१३६), उदय सुर्वे(७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क करावा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -