घरठाणेदोन मृत आठ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा बदलीचा आदेश

दोन मृत आठ सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा बदलीचा आदेश

Subscribe

केडीएमसीत 159 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या बदलीमध्ये गोंधळ

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने प्रभागातील कार्यरत असणार्‍या अनधिकृत बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील 159 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश 17 मार्च बुधवारी काढण्यात आले होते. प्रशासनाने मात्र या आदेशित केलेल्या ऑर्डरमध्ये दोन मृत कर्मचारी तर आठ सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या नावे बदली यादीत समाविष्ट केल्याने प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. मात्र याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सारवा सारव करीत कर्मचार्‍यांची करण्यात आलेली बदली यादी मध्ये झालेली चूक लागलीच लक्षात आल्याने ती रद्द केल्याची माहिती दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विविध विभागात कार्यरत असणार्‍या अधिकारी कर्मचारी यांची अनेकदा प्रशासनाने खातेनिहाय अंतर्गत बदल्या करण्याची परंपरा जोपासून ठेवली आहे. मात्र बदली झालेल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हजर होत नसल्याने केवळ कागदावर या बदल्यांचा फुगवलेला आकडा दिखाव्यासाठी दाखविला जात आहे. 17 मार्च रोजी पालिका प्रशासनाने चतुर्थ श्रेणीतील159 कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्या बदल्यांच्या यादीत चक्क मृत्यू झालेल्या दोन कर्मचार्‍यांची नावे तसेच आठ कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असतानाही अशा निवृत्त कर्मचार्‍यांना देखील बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मृत आणि सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा लेखाजोगा पालिकेच्या संबंधित विभागाकडे नाही का? याबाबत येथे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात तसेच फेरीवाला पथकातील कर्मचारी आपली बदली होऊनही बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नसल्याची चर्चा पालिका कर्मचार्‍यात सुरू आहे. दरम्यान पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चनादिवे यांनी बदलीच्या आदेशात दोन मृत्यू झालेले कर्मचारी व आठ सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचा समावेश करण्यात आल्याचे लागलीच आमच्या लक्षात आल्याने शुक्रवारी काढलेला आदेश रद्द करीत नवीन बदल्यांची यादी जारी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -