Eco friendly bappa Competition
घर ठाणे नाहीतर दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू- खासदार राजन विचारे यांचा इशारा

नाहीतर दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू- खासदार राजन विचारे यांचा इशारा

Subscribe
 नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील ४ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा,  नाहीतर जबरदस्तीने रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू असा थेट इशारा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. या संदर्भात खासदार विचारे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना निवेदन दिले आहे.
ऐरोली – कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले होते. या प्रकल्पातील झोपड्यांचे पुनर्वसन होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. हा महत्वकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून एम आर व्हि सी विभागाकडे पाठपुरावा करून प्रकल्प दोन टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतल्याचे खासदार विचारे यांनी त्या निवेदनात नमूद केले आहे. या दीघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या आयटी कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो, त्यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ व पैशाची बचत टाळण्यासाठी त्याचबरोबर दिघावासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिना अखेर पर्यंत दिघा रेल्वे स्थानका सुरु करा अशी मागणी ही खासदार विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे त्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या विनंतीला व मागणीनुसार रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार विनंती करून सुद्धा दीघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी त्यांना वेळ नाही, असे असेल तर रेल्वे प्रवाशी व दिघा वासियांकडून दिघा रेल्वे स्थानक सुरु करू असा इशाराही खासदार विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -