Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे ठाण्यात पेपर ड्रग्ज जप्त; तिघांना अटक

ठाण्यात पेपर ड्रग्ज जप्त; तिघांना अटक

अटकेतल्या तिघा ड्रग्ज पेडलर्सना 22 जूनपर्यंत कल्याण न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

Related Story

- Advertisement -

ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग्ज पेडलर्सकडून एलएसडी पेपर ड्रग्स ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल 1 हजार 466 एलएसडी पेपर जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत तब्बल 1 कोटी 2 लाख 62 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून अटकेतल्या तिघा ड्रग्ज पेडलर्सना 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी कल्याण न्यायालयाने सुनावली आहे.

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास एक जण कल्याण येथे ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड या ठिकाणी सापळा लावून भाविक विजय ठक्कर (22 रा. कल्याण) या संशयित तरुणास अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या तपासातून आणखी दोघा बड्या ड्रग्ज पेडलर्सची नावे समोर आली.

- Advertisement -

त्यानुसार मनी भार्गव आणि निवांत विल्हेकर या आणखी दोघा ड्रग्ज पेडलर्सला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात तब्बल 1 हजार 228 एलएसडी पेपर मिळून आले. तर याच प्रकरणी निवांत अनिल विल्हेकर (21, हाजी मलंग रोड, कल्याण, पूर्व) या ड्रग्ज तस्करला अटक करून त्याच्या ताब्यातून एकूण 1 हजार 466 एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. त्यांची किंमत तब्बल 1 कोटी 2 लाख 62 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -