घरठाणेthanePawar Vs Awhad : अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांना विचारले थेट तीन प्रश्न...

Pawar Vs Awhad : अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांना विचारले थेट तीन प्रश्न…

Subscribe

अजित पवार गटाचे 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर असे दोन दिवस कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ठाणे : अजित पवार गटाचे कर्जतमध्ये दोन दिवसीय वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात ? वैभव कदम च्या आत्महत्येस जबाबदार कोण? या तीन प्रश्नांची जितेंद्र आव्हाड यांनी उत्तरे द्या, असे जाहीर आवाहन राष्ट्र्वादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगर पालिका विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली. तेव्हा डॉ. जितेंद्र आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात ? हे एकदा जाहीर करा, अशी आठवण करत आनंद परांजपेंनी जितेंद्र आव्हाडांना प्रश्न केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP Vs Thackeray Group: काड्या लावण्याचे एकमेकांवर आरोप; संजय राऊत यांच्यावरून कलगीतुरा

आनंद परांजपे म्हणाले, “अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी, मी आपणांस 5 ऑगस्ट 2020 साली रात्री 8 वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका तरी कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलीसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत याचे उत्तर द्या? वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण ? या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी.  अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar Vs. Awhad : …आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना आव्हान

अजित पवार गटाचे कर्जतमध्ये शिबिर

30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर असे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी भाषण केले तर व राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समारोपाच्या भाषणात बोलताना 2004, 2017, 2029, 22 जून 2022, 2 जुलै, 12 जुलै, 12 ऑगस्टपर्यतच्या पक्षातील घटनांची सविस्तर माहिती दिली. शरदचंद्र पवारसाहेब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात व बॅलॉर्ड इस्टेट व यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजित नेहमीच खरे बोलतात यामुळे याबाबत अजित पवारांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -