घरठाणेपाणीपुरवठा देखभालीची थकबाकी द्या

पाणीपुरवठा देखभालीची थकबाकी द्या

Subscribe

ठेकेदारांचे आयुक्तांना निवेदन

ठाणे महानगर पालिकेच्या जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांची तब्बल सव्वा चार कोटीची थकबाकी पालिकेकडे असल्याने आता ठेकेदार हवालदिल झाले आहे. त्यामुळे हताश झालेल्या ठेकेदारांनी आता थकबाकी द्या नाहीतर देखभाल दुरुस्ती कामे बंद करण्याचा पवित्र घेतला आहे . याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागातील ठेकेदारांनी लेखी स्वरूपात पालिका नगर अभियंता यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या ठाणे पालिकेच्या विविध प्रभाग समितीमधील असलेल्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम आहे. या कामाची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपली. बिले सादर केली ती देण्यासाठी मुख्य लेख विभागाकडे सादरही केली. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर लेख विभाग देत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने जुन्या कामानाच तोंडी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. मात्र कोविडच्या काळात पाणीपुरवठा विभागातील महत्वाची कामे जलवाहिनी दुरुस्ती आणि देखभालीसाठी कर्मचारी यांचे पगार आणि अन्य खर्च यामुळे ठेकेदार हताश झाले आहेत. त्यामुळेच आता थकीत देयक द्या, नाहीतर देखभाल आणि दुरुस्तीची कामे थांबविण्याचा इशारा पालिका नगर अभियंता यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -