घरठाणेज्यांनी लोकांचा विश्वासघात केला त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी जागा दाखवली

ज्यांनी लोकांचा विश्वासघात केला त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी जागा दाखवली

Subscribe

खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला

2019 मध्ये ज्यांनी स्वतःसाठी लोकांचा विश्वासघात केला, त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी त्यांना जागा दाखवली, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे सातव्या नंबर म्हणजे शेवटून पहिला नंबर असल्याचा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली ग्रामीण भागातील खोनी गाव शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले कि, कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे जिल्हा असेल आपल्याला निधीची कमतरता नाही. येणार्‍या महापालिका, ग्रामपंचायत, लोकसभा विधानसभा, निवडणुका जिंकायची असेल तर संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल. घराघरापर्यंत सरकारचं काम पोहोचवावं लागेल, जोमाने कामाला लागा, घरा घरात शिवसैनिक तयार झाला पाहिजे, शिवसेना पोहोचली पाहिजे, असे काम करा, हेवेदावे सोडून संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकार्‍यांना केले.

जनतेचा मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललाय. या वाढत्या विश्वासावर शिक्कामोर्तब करण्याचे काम यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाले आहे. काही लोक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत, असे म्हणाले पण जर आमच्या ठिकाणी ते असते तर आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या असे बोलले असते. 2019 मध्ये स्वतःसाठी तुम्ही लोकांचा विश्वासघात केलात त्याचा बदला लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घेतल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुमची जागा लोकांनी दाखवली आहे. निकालात अपेक्षांपेक्षाही मागे सातव्या नंबर म्हणजे शेवटून गेले. शेवटून पहिला नंबर असल्याचा टोमणा ही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -