घरठाणेसोमवारी उल्हासनगर परिसरात राजकीय धुराळा

सोमवारी उल्हासनगर परिसरात राजकीय धुराळा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शहाडमध्ये

उल्हासनगर । सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उल्हासनगरातील दशहरा मैदानात संविधान हक्क परिषदेच्या वतीने आयोजित शाळेच्या खासगीकरण विरोधी एल्गार महासभेसाठी येणार आहेत. तर दुसरीकडे याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी शहाड येथे येणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या 62 हजार शाळा दत्तक शाळा योजनेतून खासगी कंपनी अथवा दानशूर व्यक्ती, संस्थांना विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात संविधान हक्क परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात मोहिम उघडण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत संविधान हक्क परिषदेच्या वतीने उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच येथील दसरा मैदानात एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना हक्क परिषदेचे सचिव अनिल अहिरे यांनी सांगितले की, या कार्यक्रमात राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, रिपब्लिकन नेते गंगाराम इंदीसे, ठाणे युवा काँग्रेसचे सुधीर पाटील, शिवसेनेचे नेते धंनजय बोडारे, पत्रकार किरण सोनवणे, अण्णा रोकडे, अंबरनाथचे अध्यक्ष सदामामा पाटील, धनंजय सुर्वे, कबीर गायकवाड, संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव उपस्थित राहणार आहेत. उल्हासनगरात सोमवारी शरद पवार काय विचार व्यक्त करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे शहाड परिसरातील अ‍ॅन्टॅलिया येथील उल्हासनगर महापालिकेच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उल्हासनगरात येत आहेत. त्यांच्यासोबत भाजपाचे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनपा आयुक्त अजीज शेख, शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर संघटक नाना बागुल, शहर प्रमुख रमेश चव्हाण यांच्यासमवेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. दोन मोठ्या पक्षाचे नेते उल्हासनगरात येत असल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शिवसेना-भाजपातील तणाव कमी होणार
शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात आणि भाजपात तणाव निर्माण झाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचे विपरीत परिणाम होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, केंद्रिय मंत्री कपिल पाटील एकत्र येऊन एकीचा संदेश देणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -