घरठाणेतिसऱ्या लाटेत ४ ते १४ या वयोगटाला सांभाव्य धोका

तिसऱ्या लाटेत ४ ते १४ या वयोगटाला सांभाव्य धोका

Subscribe

ठामपा आतापासून सज्ज

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने या लाटेत ४ ते १४ या वयोगटाला सांभाव्य धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने ठाणे महापालिकेने एक कक्ष उभारण्याचा निर्णय घेत तेथे आतापासून १०० बेड्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. ही कक्ष महिनाभरात पार्किंग प्लाझा येथे सज्ज होणार असून त्यासाठी आवश्यक असणारे तज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळही आवश्यकतेनुसार घेतले जाणार आहे. तसेच येथील बेड्स ची व्यवस्था ही विशेष असणार असून रुग्ण बालकासोबत त्यांच्या पालकांपैकी एकाला राहता येणार  आहे. तसेच १०० बेडमध्ये ५० ऑक्सीजनचे, २५ आयसीयु आणि २५ आयसीयु व्हॅन्टीलेटरचे बेड उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे.

ठाणे  महापालिकेने पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाटही थोपविण्यात बऱ्याच अंशी यश मिळविले आहे. परंतु आता तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या लाटेसाठी सज्ज असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. येत्या जुलैपर्यंत ही लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेने ऑक्सीजन निर्मिती, व्होल्टास येथील कोवीड सेंटर सुरु करणे आदी मोहीम हाती घेतली आहे. याशिवाय या तिसऱ्या  लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभावण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळेच आता त्यांच्यासाठी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. लहान मुलांना जपा, त्यांना घराबाहेर पाठवू नका असेही सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी लहान मुलांचा कक्ष पार्कीग प्लाझा कोवीड सेंटर येथे उभारला जाणार आहे. याठिकाणी १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून त्यामध्ये ३ ते १४ वयोगटातील मुलांचे नियोजन केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पार्कीग प्लाझा येथील १०० बेडमध्ये ५० ऑक्सीजनचे, २५ आयसीयु आणि २५ आयसीयु व्हॅन्टीलेटरचे बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच या ठिकाणी लागणा:या मनुष्यबळाची तसेच तज्ञ डॉक्टारांची निवड देखील येत्या महिनाभरात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय लहान मुले ही एकटी राहू शकत नसल्याने त्यांच्याबरोबर आई, किंवा वडील राहू शकतील अशा पध्दतीचे मोठे बेड उपलब्ध केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेबरोबर आता तिसऱ्या लाटेसाठी देखील महापालिकेचा कोरोना वॉररुम सज्ज ठेवण्यात येणार आहे. २४ तास येथे सेवा उपलब्ध ठेवली जाणार आहे. तसेच त्याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कॉलला तत्काळ रिसपॉन्स देऊन रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या लाटेतही या वॉर रुमच्या माध्यमातून योग्य पध्दतीने काम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -