घरठाणेPothole Death : खड्ड्यांतून वाट काढताना बाईकवरून पडला, अन् गमावला जीव

Pothole Death : खड्ड्यांतून वाट काढताना बाईकवरून पडला, अन् गमावला जीव

Subscribe

अनेक परिसरांमध्ये पावसाळ्या आधी खड्डे बुझवले नसल्याने मोठ्या प्रमाणात वारंवार दुर्घटना घडत आहेत. ठाण्यामध्येही खड्ड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने जाताना गायमुख जकात नाक्याजवळील खड्ड्यामुळे बाईकवरून पडून मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले (२३) हा बाईकस्वार गंभीररीत्या जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मोहम्मद मुंब्र्यातील रहिवासी होता. अशाप्रकारे ठाणे शहरातील खड्ड्याचा तो पहिला बळी ठरला आहे. या घटनेनंतर ती ठाणे शहरातील खड्डे बुजतील का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

मुंब्रा अमृतनगर येथे राहणारा दुचाकीस्वार मोहम्मद हा रशीद शेख यांच्या मालकीची दुचाकी घेऊन गायमुख जकात नाका येथून ठाण्याच्या दिशेने येत होता. जकात नाक्या जवळ आल्यावर तेथे पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून त्याच्या अपघात झाला. त्यामध्ये मोहम्मद याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

- Advertisement -

तातडीने त्याला कासारवडवली पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद याला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


असदुद्दीन ओवैसींच्या दिल्लीतील घरावर हल्ला, हिंदू सेनेच्या पाच जणांना अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -