Eco friendly bappa Competition
घर ठाणे गृहखात्याची शक्ती आणि बळ केवळ सत्ता संघर्षासाठी- सुषमा अंधारे

गृहखात्याची शक्ती आणि बळ केवळ सत्ता संघर्षासाठी- सुषमा अंधारे

Subscribe

गृह खात्याची शक्ती ही केवळ सत्ता संघर्षासाठी वापरण्याचे ठरवले गेल्याने कल्याण शहरात म्हणूनच गुन्हेगारांचा मोकाट संचार सुरू असल्याचे मत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसापूर्वी कोळसेवाडी येथे एका बारा वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. कल्याण शहरात गुन्हेगारांचा वाढता वावर आहे. दोन ऑगस्ट रोजी एका मुलीच्या हत्येची घटना घडली. शिवसेनेतर्फे पोलिसांना निवेदन देत पोलिसांची चर्चा करीत शाळा आणि महाविद्यालयात परिसरात पोलिसांची जास्तीची गस्त वाढवण्याची मागणी पालकांनी पोलिसांकडे केली. मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने घटनेत वाढ होत असल्याचे मत सुषमा अंधारे यांनी यावेळी मांडले.
सत्ता संघर्षातून सावरण्यासाठी गृह खात्याची एनर्जी वाया जात असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. सर्वसामान्य नागरिकांना न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. गृह खाते ठरवून काम करीत असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहखात्याची शक्ती आणि बळ सत्ता संघर्षासाठी वापरत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -