घरठाणेशहापुरातील वीज पुरवठा खंडीत करु नये; महावितरणला इशारा

शहापुरातील वीज पुरवठा खंडीत करु नये; महावितरणला इशारा

Subscribe

प्रहारचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांनी शहापूर उपकार्यकारी अभियंता कटकवार यांना एक निवेदन देऊन ग्राहकांना वीजबीलात सवलत देण्याची मागणी केली आहे.

अदिवासी व दुर्गम अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष विजबील रिडिंग न घेतल्याने अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिकची वीजबिल देयक आल्याच्या अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयात प्राप्त झाल्या. प्रहारचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांनी शहापूर उपकार्यकारी अभियंता कटकवार यांना एक निवेदन देऊन ग्राहकांना वीजबीलात सवलत देण्याची मागणी केली आहे. शहापूर तालुक्यात ग्रामीण भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. या काळात अनेक ग्राहकांना रोजगार नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

निवेदन सादर

शहापूर तालुक्यात एकुण ८२ हजार ग्राहक असुन ज्यापैकी १०८०० असे ग्राहक आहेत. त्यांची १० कोटी थकबाकी आहे. या ग्राहकांनी कोरोनोकाळात एकही बिल भरलेले नाही. तरी आपण त्यांना तीन टप्यात सवलत देणार आहोत.
– अविनाश कटकवार, उपकार्यकारी अभियंता, शहापूर

- Advertisement -

मात्र सध्या परिस्थितीत ग्राहकाकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देऊन थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन कापणार असल्याचे महावितरण विभागाकडून स्पष्ट केले आहे. म्हणून ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना सकारात्मक दिलासा द्यावा तसेच थकीत वीज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन न कापता त्यांना वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्याची सोय उपलब्ध करुन द्यावी असे निवेदन उपकार्यकारी अभियत्यांना देण्यात आले आहे. यावेळी कटकवार यांनी ग्राहकांच्या समस्या निवारण करण्याचे आश्वासक केले. या प्रसंगी राम जागरे सर, प्रहारचे तालुका कार्यअध्यक्ष धनाजी धसाडे,सहसचिव प्रसाद भोईर, सह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा –

मनसेच्या गोटात मोठी खळबळ, ३२० पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -