Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे वीज खंडित ग्राहकांकडून वीजचोरी

वीज खंडित ग्राहकांकडून वीजचोरी

Subscribe

शहापूर, टिटवाळा उपविभागातील 121 जणांवर गुन्हे दाखल

वीजबिल थकीत ठेवून वीजचोरी करत महावितरणचे दुहेरी नुकसान करणार्‍या शहापूर आणि टिटवाळा उपविभागातील तब्बल 121 जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या सर्वांविरुद्ध वीज कायद्यानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने शहापूर उपविभागातील शेणवा शाखा कार्यालयांतर्गत मळेगाव, कुडशेत, कवठेवाडी, लिंगायतपाडा, किन्हवली, रणविहीर, कोठारे, जळक्याची वाडी, खंडुची वाडी, कृष्णाची वाडी, मुसई वाडी, शिंदपाडा आदी भागात थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी केली. या तपासणीत 60 जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.

तर टिटवाळा उपविभागातील गोवेली शाखा कार्यालयांतर्गत म्हसकळ, घोटसर, वसंतनगर, मामनोली, रायते, म्हारळ आणि वरप परिसरातल्या तपासणीत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित 31 ग्राहकांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. खडवली शाखा कार्यालयांतर्गत गुरवली व गुरवली पाडा परिसरातील 18 ग्राहकांकडे वीजचोरी सापडली. मांडा शाखा कार्यालयांतर्गत बल्याणी, दर्गा रोड, नांदप, कोकणनगर भागात 12 जणांकडे वीजचोरी आढळली. टिटवाळा उपविभागात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या एकूण 61 जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला.
वीजचोरीच्या देयकाचा विहित मुदतीत भरणा न झाल्याने शेणवा शाखेचे सहायक अभियंता विश्वजीत खैतापुरकर, गोवेली शाखेचे सहायक अभियंता धनंजय पाटील, खडवली शाखेचे कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे आणि मांडा शाखेचे सहायक अभियंता प्रमोद महाजन यांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून 121 जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार आणि टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -