घरठाणेप्रा. हरी नरके यांचे ठाण्यात व्याख्यान

प्रा. हरी नरके यांचे ठाण्यात व्याख्यान

Subscribe

जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यांचे औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ’ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री’ या विषयावर प्रा. नरके संबोधित करणार आहेत. शुक्रवार, १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. त्यानुसार, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -