संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात कार्यक्रम

संविधानाच्या प्रतिची भव्य मिरवणूक

कल्याण । 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत रिपाई प्रणित सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास प्रामुख्याने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार रिपाई चे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक संतोष जाधव संग्राम मोरे भारत सोनवणे यांनी दिली आहे.

संविधान गौरव दिनानिमित्त नालंदा बुद्ध विहार समिती मोहने तर्फे भारतीय संविधानाची भव्य मिरवणूक प्रज्ञा जेतवन बुद्ध विहारापासून 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. संविधानाची मिरवणुकीची सांगता नालंदा बुद्ध विहार येथे होईल. संविधान या विषयावर राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वनाथ जाधव भूषविणार असून रिपाईचे मोहने शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड नगरसेविका शितल गायकवाड युवा अध्यक्ष दिनेश जाधव उद्योगपती मोहन जाधव मुकेश जाधव हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती नालंदा बुद्धविहार समितीचे जनरल सेक्रेटरी बीएफ वाघमारे यांनी दिली आहे.

संविधान जागर व शाहिरी जलसा
27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रज्ञा बुद्ध विहार जेतवन नगर येथे सायंकाळच्या सुमारास संविधान जागर आणि शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने शाहीर चरण जाधव सचिन डांगळे आकाश पवार ऐश्वर्या पवार भीमराव खेत्रे स्वप्नील शिरसाट हे शाहिरी जलसा सादर करणार आहेत.