डोंबिवलीत संरक्षक भिंत कोसळली, दोन मजुरांचा मृत्यू

डोंबिवली – डोंबिवलीत रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे तर, पाच मजूर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्नीशमन पथक तातडीने रवाना झाले असून जमखींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेत रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. सायंकाळी चार वाजता अचानक भिंत कोसळली. भितींच्या ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकले होते. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले असता त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर, उर्वरित तिघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहेत.

मणिक पवार (६२), विनायक चौधरी (३५), युवराज गुत्तवार (३५) अशी जखमींची नावे आहेत. तर, मल्लेश चव्हाण (३५), बंडू कोवासे (५०) अशी मृतांची नावे आहेत.