घरठाणेकल्याण-सावंतवाडी पॅसेंजर सुरु करण्यासाठी रेल्वे समिती प्रयत्नशील

कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर सुरु करण्यासाठी रेल्वे समिती प्रयत्नशील

Subscribe

कल्याण आणि आसपासच्या शहरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असून या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरु करण्यासाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे समिती गेल्या ५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

कल्याण आणि आसपासच्या शहरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असून या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरु करण्यासाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे समिती गेल्या ५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या समितीमध्ये सुनिल उतेकर, डी के सावंत, जयवंत परब, राजू कांबळे, सुजित लोंढे, शांताराम नाईक, संजय रेवणे, अशोक परब, सुपर्ण गावडे, गणेश नाईक, मनीष खानविलकर, भाई देऊळकर, सुपर्णा गावडे, उज्वला पिळदार, मयुरी जाधव, शैलेश रावत, संजय गावडे आदी कार्यकर्ते किशोर देसाई, उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.

कल्याण सावंतवाडी रेल्वे समितीचे काम मागील पाच वर्षापासून चालू आहे. कल्याण, कसारा, कर्जत, भिवंडी या प्रमुख शहरातील कोकणातील प्रवाशांना दिवा येथून सकाळी सहावीची गाडी पकडण्यासाठी वेळ व पैसा वाया जात आहे. सकाळी सहावीची गाडी पकडण्यासाठी प्रवासी रात्री येणारी परतीच्या गाडी मध्येच बसून गाडीमध्ये वस्ती करतात व सकाळी ती गाडी पकडून आपल्या परिवाराबरोबर गावी जातात. त्यानंतर रात्री बाराच्या दोन गाड्या आहेत त्या गाड्यांना लाईन दुपारी तीन वाजल्यापासून ठाणा स्टेशनला लागली जाते. तरी फक्त दोनच डबे ठेवण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

कोकणात कल्याण स्टेशनवरून गाड्या सोडण्यासाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे समिती पाठपुरावा करत असून कर्जत, कसारा, भिंवडी, ठाणे, मुंबई ही प्रमुख शहरे कल्याण शहराशी जोडले जातात. कल्याणहून दातिवली, पनवेलमार्गे कोकणात रेल्वे गाड्या सोडल्यास दादर, ठाणे, दिवा या स्टेशनवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. प्रवाशांना तर याचा फायदा होणार असून छोट्या व्यापार्यांना देखील याचा फायदा होऊन कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पनात वाढ होईल.

पुण्याहून येणाऱ्या गाड्या कोकणात कर्जतमार्गे पनवेलला जातात. त्या गाड्या कल्याणहून फिरल्या तर प्रवाशांना फायदा होईल. नाशिक वरून येणारी गाडी कल्याण मार्गे घेतल्यानंतर तिचा पण मुंबई प्रवास करणाऱ्या व कोकण प्रवाशांना त्याचा भरपूर फायदा होईल. या समितीच्या माध्यमातून कल्याण सावंतवाडी, साई भक्तांसाठी शिर्डी सावंतवाडी व्हाया कल्याण, पंढरपूर पुणे व्हाया कल्याण पनवेल ते सावंतवाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर, ठाणे व्हाया कल्याण, कर्जत ते सावंतवाडी, पुणे कर्जत व्हाया पनवेल ते सावंतवाडी ट्रेन सुरु करा, कल्याण स्टेशन व ठाकुर्ली स्टेशनमध्ये नवीन टर्मिनल बनवा, कोकणातून येणाऱ्या सर्व गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यात यावा, कल्याणवरून नवीन गाडी सुरु झाल्यास दोन कोच आणि दोन जनरल डब्बे देण्यात यावे आदी मागण्यांसाठी समिती पाठपुरावा करत आहे.

- Advertisement -

२०१९ साली ठाणे जिल्हा परिषदेने कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरु करण्यासाठी ठराव मंजूर करून केंद्राला पाठवला होता. समितीच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, माजी रेल्वे मंत्री रमेश प्रभू, माजी मंत्री दीपक केसरकर, इतर खासदार आमदार यांच्याभेटी घेऊन याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हातील सुमारे ३५० हून अधिक ग्रामपंचायतींचे पाठींबा पत्रे देखील समितीने गोळा केली आहेत. २०१९ साली बेलापूर येथे कोकण भवन येथे या रेल्वेसाठी लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले. सध्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देखील समिती पाठपुरावा करत असल्याची माहिती सुनील उतेकर यांनी दिली.

हेही वाचा –

राज्यपालांची भूमिका संशयास्पद, राजभवन भाजप कार्यालय झालंय – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -