घरठाणेठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरी झाली राखीपौर्णिमा

ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरी झाली राखीपौर्णिमा

Subscribe

ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर राखीपौर्णिमा साजरी झाली. महापालिकेच्या हजेरी पेटीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरूष कर्मचारी, महापालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

ठाणे : रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण.. हा सण गुरुवारी ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर साजरा करण्यात आला. महापालिकेच्या हजेरी पेटीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरूष कर्मचारी, महापालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले असून यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ठाणे महापालिकेच्या एकूण ५० हजेरी शेड असून या ठिकाणी महापालिकेचे १९०० कर्मचारी असून त्यापैकी ११४० पुरूष व ७६० महिलांचा समावेश आहे. तर एकूण २०३६ कंत्राटी कामगार असून त्यापैकी १२२२ पुरूष व ८१४ महिला काम करीत आहे. आज महापालिकेच्या सर्व हजेरी शेडवर महिला कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे रक्षाबंधन साजरे –

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात ‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी आणि सलाम बॉम्बे या संस्थेच्या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरे केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -