घरठाणेआपत्ती परिस्थितीशी दोन हात करण्यास ठामपा सज्ज; २६ बोटींचा ताफा, सहा ठिकाणी...

आपत्ती परिस्थितीशी दोन हात करण्यास ठामपा सज्ज; २६ बोटींचा ताफा, सहा ठिकाणी बसवले पर्जन्यमापक यंत्र

Subscribe

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन, टोल फ्री क्रमांक आदी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपध्दती देखील तयार करण्यात आली आहे

पावसाळ्यात आपत्ती परिस्थिती ओढवल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने चोख तयार केली आहे. यामध्ये लाईफ जॅकेट आणि २६ बोटांचा ताफा तयार ठेवला आहे. तसेच शहरात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रण बसविले आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यासाठी १३ ठिकाणी रात्र निवारे सज्ज ठेवण्यात असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.येत्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सुनपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानुसार ठामपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सक्षम करून येथे ऑन डय़ुटी २४ अशा पध्दतीने कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन, टोल फ्री क्रमांक आदी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपध्दती देखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शोध व बचावकार्यासाठी बोट, जेसीबी, लाईफ जॅकेट, लाईफ बॉईज आदी साहित्य घेण्यात आले आहे. तसेच १२ फायर इंजिन, ५ इमरजेन्सी टेंडर, ८ वॉटर टेंडर, ३ जम्बो वॉटर टेंडर, क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल ८, जीप, टर्न लेबर लॅडर आदींसह इतर व्यवस्था अग्निशन विभागाकडून सज्ज ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देखील १५ लाईफ जॅकेट , १५ लाईफ बॉय, रबरी बोट , ४ प्रशिक्षित व सुटका गट, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आर.डी.एम. सी. जॅकेट आदींसह इतर साहित्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच एखाद्यावेळेस पावसाळ्यात मोठी आपत्ती झाली तर त्यावेळेस देखील नागरीकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे यासाठी महापालिकेच्या मालकीच्या १० व खाजगी १६ बोट अशा एकूण २६ बोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तर शहरात ६ ठिकाणी पजर्न्यमापक यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. तर एखाद्या वेळेस आपत्ती ओढवल्यानंतर तेथील नागरीकांची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यासाठी १३ ठिकाणी रात्र निवारे सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकही सज्ज करण्यात आले आहे. या टीममध्ये १ अधिकारी आणि ३३ ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

” पावसाळ्याच्या दृष्टीने सर्व तयार महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आपत्ती परिस्थिती वेळीच हाताळता येईल यासाठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच बोटी आणि लाईफ जॅकेट,लाईफ बॉय आदी ही साहित्य सामुग्री देखील उपलब्ध करून दिली आहे. ”
– संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -