शहरात ७८ लसीकरण केंद्रात नियमित लसीकरण सुरु

नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात ७८ लसीकरण केंद्राद्वारे व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. प्रत्येक या लसीकरण सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, व्हॅक्सिनेटर, डेटा ऑपरेटर आणि निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठामपा मोहिमेअंतर्गत २५ लाख ३६ हजार जणांचे लसीकरण
ठाणे शहरात आतापर्यंत २७,८५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर १८,५९४ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन कर्मचारी यामध्ये ३१,५१२  लाभार्थ्यांना पहिला व  १८,५८९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत ३,१५,१०५  लाभार्थ्यांना पहिला तर २,५७,६५७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये २,०७,८०३ लाभार्थ्यांना पहिला डोस व १,४३,२०५ लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये ८,३५,१९२ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ६,५७,५४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यासोबतच १५ ते १८ वयोगटातील २३,३०३ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील ७२१ गर्भवती महिलांचे, २३२५ स्तनदा माता, ५२ तृतीय पंथाचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या ६०२ व्यक्तींचे देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण २५ लाख ३६ हजार ३५९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.