ठाण्यात रेमडेसिवीरचा साठा संपला; महापालिकेच्या चिंतेत वाढ

ग्लोबल रुग्णालयात ९५० कोरोना रुग्ण आहेत. मात्र रेमडेसिवर संपल्याने या रुग्णाचे पुढे काय होणार? असा असा प्रश्न पालिका आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आहे.

Remdesivir stocks depleted in Thane; An increase in municipal concern
ठाण्यात रेमडेसिवीरचा साठा संपला; महापालिकेच्या चिंतेत वाढ

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर परिनामकारक असणाऱ्या रेमडेसिवर इंजेक्शन कमतरता होती. मात्र आता महापालिकेकडे एकही रेमडेसिवर उपलब्ध नाही. पालिकेकडे असलेला रेमडेसिवरचा सगळा साठा संपला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून खाजगी कोविड रुग्णालयांना रोज पुरवठा केला जात आहे. खाजगी रुग्णालयांना ११ हजार ६२३ रेमडेसिवरचा साठा दिला असल्याचे जिल्हधिकारी कार्यालयाने सांगीतले. आता ठाणे पालिकेच्या कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी एकही रेमडेसिवर नसल्याचे पालिकेने घोषित केले आहे.गेल्या काही दिवसापासून राज्यासह ठाण्यात रेमडेसिवरचा कमतरता निर्माण झाली आहे.

रेमडेसिवर इंजेक्शन आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रेमडेसिवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल सुरु आहे. त्यामुळे याबद्दल काळाबाजार सुरु होता. यावर उपाय म्हणून मेडीकल मध्ये न विक्री करता थेट रुग्णालयांनीच ते उपलब्ध करुन द्यावे असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार जिल्हाधिकराी कार्यालयामर्फत सदर इंजेक्शन चा पुरवठा करण्यास सुरवात केली. मात्र मागणीपेक्षा अर्धाच पुरवठा होत आसल्याचे समोर आले आहे. रेमडेसिवरचा साठा जसा उपलब्ध होतो तसा तो रुग्णालयांना पुरवला जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगीतले आहे.

 

ठाणे पालिकेकडे काल फक्त २०० रेमडेसिवर शिल्लक हेत्या. १८ एप्रील पर्यंत पुरेसा साठा मिळेल असे पालिकेला वाटत होते. मात्र अद्यापही साठा न मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात ९५० रुग्ण आहेत. मात्र रेमडेसिवर संपल्याने या रुग्णाचे पुढे काय होणार? असा असा प्रश्न पालिका आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आहे. पालिकेने मागणी करुनही अद्यापही हा साठा मिळालेला नाही. यावर दुसरा कोणता पर्याय आहे का? याची तपासणी सुरु आहे. रेमडेसिवर लवकर उपलब्ध होईल आशी शक्यता आहे. असे ठाणे पलिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले.