घरठाणेतानसा अभयारण्यातील तलावातील गाळ काढला पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाण्याची सोय होणार

तानसा अभयारण्यातील तलावातील गाळ काढला पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाण्याची सोय होणार

Subscribe

या आधीही चांदरोटी येथील ८८४ कंपार्टमेंटच्या हद्दीलगत असलेल्या तलावाचे काम पूर्ण केले आहे. त्यातून सुमारे २५ हजार टन गाळ काढण्यात आला होता.

तानसा अभयारण्यातील माहुली परिसरातील काटेकोईपाडा येथील तलावातील गाळ काढल्याने या तलावाने मोकळा श्वास घेतला आहे. वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनानुसार सीएसआर निधी अंतर्गत या तलावातून तब्बल सोळा हजार टन गाळ बाहेर काढण्यात आला असून नैसर्गिक स्रोत असलेला तलाव आता पाण्याने भरत आहे. यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली असून किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक टंचाईग्रस्त पाड्यांवरील ग्रामस्थ महिला भगिनींची देखील पाण्याची तहान भागणार आहे.तानसा अभयारण्य परिसरातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी चांदरोटी येथील ८९० कंपार्टमेंट लगत असलेल्या काटेकोईपाडा तलावात खूप मोठ्या प्रमाणांत मातीचा साठा झालेला होता. पाण्याचा नैसर्गिक स्रोत असूनही प्रचंड गाळ असल्यामुळे कोरडेठाक पडलेला हा तलाव असून नसल्यासारखाच झाला होता.

 

- Advertisement -

या तलावातील गाळ काढल्यास स्थानिक ग्रामस्थांसह अभयारण्यातील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल या उद्देशाने वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी वासिंद येथील जीसडब्ल्यू या कंपनीशी संपर्क साधला.कंपनीने सीएसआर निधीतून या तलावातील गाळ काढावा अशी मागणी केली. याबाबत ठाकूर यांनी कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर कंपनीने काटेकोईपाडा येथील गाळाने भरलेल्या तलावाची पहाणी केली व सीएसआर निधीतून गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी दिली. अशी माहिती ठाकूर यांनी दिली. या तलावातून तब्बल १६ हजार टन गाळ काढण्याचे काम झाले असून या तलावातील नैसर्गिक स्रोत मोकळे झाल्याने तलाव पाण्याने भरू लागला आहे.

या आधीही चांदरोटी येथील ८८४ कंपार्टमेंटच्या हद्दीलगत असलेल्या तलावाचे काम पूर्ण केले आहे. त्यातून सुमारे २५ हजार टन गाळ काढण्यात आला होता. या दोन तलावांमधील पाणी साठ्यांमध्ये वाढ होत असून वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासह परिसरातील शेतकऱ्यांना शेती, भाजीपाल्याचे पीक घेता येणार असून त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर जवळच्या जंगला मधील वन्यजीव आणि पक्ष्यांमध्येही मोठ्या प्रमाणांत वाढ होईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -